जेष्ठ व ख्यातनाम लेखक श्री विजय तेंडुलकर यांचे नुकतेच निधन झाले.निर्भिड आणि निर्भय असा एक लेखक आपल्यातुन निघून गेला ही फारच दुखाःची गोष्ट आहे.
ह्या ना त्या कारणाने तेंडुलकर, त्यांचे लिखाण व त्यांची भुमिका सतत वादग्रस्त राहीली.माणसांमधला हिंसकपणा,क्रौर्य व लैंगिकता असे पठडीबाहेरचे विषय तेंडुलकरांनी लेखनासाठी निवडले.भल्याभल्यांनी त्यांच्यावर विकृतपणाचा आरोप केला.
सखाराम बाईंडर व घाशीराम कोतवाल ही त्त्यांची नाटके विषेश वादग्रस्त ठरली.शारीरिक मारहाणही त्यांना सहन करावी लागली.
इतके सारे सहन करूनही पठडीबाहेरचे लिहीणे त्यांनी काही सोडले नाही.
तेंडुलकरांच्या लेखनाला पठडीबाहेरचे का म्हणायचे हे एक दोन उदाहरणांवरुनच स्पष्ट होईल.त्यांच्या एका कथेत त्यांनी सावत्र भावंडांमधल्या लैंगिक आकर्षणाचे चित्रण त्यांनी केले आहे. विकृत् (???) नसलेले असे काही थोडेसेच लेखनही तेंडुलकरानी केले आहे.तेही तितकेच वाचनीय आणि रोचक आहे. त्यांनी लिहिलेल्या त्यांच्या बालपणीच्या आठवणी वाचल्याचे आठवते.
तेंडुलकरांच्या लेखनावर केला जाणारा विकृतीचा आरोप मला व्यक्तीशः मान्य नाही.त्यांना विकृत म्हणायचे झाले तर रुग्णाच्या शरीरात कोठे काय काय बिघाड झाला आहे हे जाणून घेण्यासाठी X-Ray काढणाया, sonography करणाया, मलमुत्र तपासणाया doctorला सुध्दा विकृत म्हणावे लागेल."राजा नागडा आहे" हे सांगणाया बालकालासुध्दा विकृत ठरवावे लागेल.
तेंडुलकरांचे घाशीराम कोतवाल हे नाटक मी नुकतेच बघितले. हे नाटक जेव्हा प्रसिध्द् झाले तेव्हाच्या म्हणजे १९७२-७३ सालच्या राजकीय परिस्थीतीचा काही संदर्भ या नाटकाला आहे. ७२ साली मी जाणत्या वयाचा नसल्यामुळे हा संदर्भ मला पुर्णपणे समजू शकला नाही.पण जितके काही समजले तेवढ्यावरुन् तेंडुलकरांविषयी पुर्ण आदर बाळगून खेदाने असे म्हणावेसे वाटते की सदरहू नाटकाला ब्राम्हणद्वेषाची थोडीशी किनार आहे.विषेशत: तेंडुलकरांनी नाना फडणविसांच्या तोंडी घातलेले खालील स्वगत ऐकुन फार वाईट वाटते. "घाशा अक्करमाशा,चितपावनावर असेल तुझा झोक, करशील कारभार सवाई,होतील आपले प्रमाद् जमा तुझ्या खात्यावर,करनेको हम, भरनेको हमारा कोतवाल". नाना हे तेंडुलकरांनी दाखवल्याप्रमाणे दुर्वर्तनी असतीलही.
पण सर्वच तत्कालिन ब्राह्मणांना, विषेशतः पुण्याच्या ब्राह्मणांना काळ्या रंगात रंगवायची जरूर नव्हती असे आपले मला वाटते.
अर्थात या गोष्टीमुळे तेंडुलकरांचे मोठेपण कमी होत नाही हे वेगळे सांगणे नलगे.
Wednesday, May 21, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment