Thursday, November 11, 2010

ओबामांचे कपडे : एक मुक्तचिंतन

चहाच्या टपरीवर नुकतीच कानी पडलेली एक चर्चा :
"ओबामा घरी जाण्यासाठी इथुन निघताना आंघोळ करुन निघाले असतील का रे?"
"अर्थातच"
"आंघोळ नाही रे, त्याला शॊवर घेणे म्हणतात."
"तेच ते रे!"
"नाही. नुसतेच ड्राय क्लिनिंग केले असेल"
"मग ते आंघोळीनंतर कपड्यांचे काय करत असतील?"
"म्हणजे?"
"म्हणजे स्वत:चे कपडे स्वत:च धुवत असतील का?"
"येडा की काय? ताजची स्वत:ची लॊंडरी असेल की?"
"त्यांचे कपडे ताजमधला भय्या थोडाच धुवेल? त्यांच्याबरोबरच तिकडचा धोबीसुध्धा आला असेल."
"हो.नाहीतर भय्या कपड्यात खाजकुयली टाकायचा."
"खाजकुयलीला हिंदीमधे काय म्हणतात बरं?"
"ओबामीण बाई एकदम साध्या वाटतात. ओबाम्याचे आणि त्यांचे निदान आतले कपडे तरी त्या स्वत:च धुवत असतील."
"नाही रे. ती काही झालं तरी अमेरीकन बाई. त्यात फर्स्ट लेडी, ओबामांना ती त्यांचे कपडे स्वत:लाच धुवायला लावत असेल."
"छट. त्यां दोघांच्या कपड्यांचे पेपर श्रेडर मधे तुकडे तुकडे करत असतील."
"जाळुन टाकत असतील"
"हो. नाहीतर त्या कपड्यांचा लिलाव व्हायचा."
"तुकडे करुन शिवाय जाळत असतील"
"ते सकाळी निघाले म्हणजे ओले कपडे प्लास्टीकच्या पिशवीतुन नेले असतीलच."
"विमानाच्या खिडकीत वाळत टाकतील. म्हणजे व्हाईट हाउस यीईपर्यंत खडखडीत वाळतील."
"अरे लेका, खिडकी उघडी असायला ती काय तुला रत्न्नांग्रीची येस्टी वाटली होय?"
"मी सांगतो, विमानात एखादी दोरी बांधत असतील कपडे वाळत घालायला.
.....
(चहा आल्यामुळे ही मौलिक चर्चा इकडेच थांबली.)

0 comments: